राज्यात चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे (SIT) बीडमधील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे.तक्रारीनुसार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीतील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने तपास यंत्रणा या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहे.दरम्यान, या आरोपांबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र, प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे SIT कडून सर्व बाजूंनी तपास केला जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ashok Kharat Case: सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? बीडमधील व्यक्तीची SIT कडे तक्रार; रुपाली चाकणकरांविरोधात आरोप
RELATED ARTICLES

